महाराष्ट्र मुंबई

मुंबईत येणाऱ्यांसाठी महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्यावरून बिहार पोलिसांनी महापालिकेवर आरोप केले होते. या प्रकरणानंतर महापालिकेनं कडक भूमिका घेतली आहे.

महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 दिवस क्वारंटाइन राहण्याचा नियम सक्तीचा केला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेनं आदेश काढले आहेत.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना महापालिका प्रशासनानं क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितलं होतं. त्यावरून बृह्नमुंबई महापालिकेवर टीका करण्यात आली होती. या प्रकरणानंतर महापालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे. महापालिकेनं क्वारंटाइनच्या नियमासंदर्भात नवीन आदेश काढले आहेत.

राज्य सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या आदेशातील क्वारंटाइनच्या नियमाचा हवाला देत महापालिकेनं मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनं 14 दिवस होम क्वारंटाइन राहणं अनिवार्य असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

“भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”

मनसे नगरसेवकावर अजित पवार भडकले, म्हणाले…

पावसामुळे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला

पाच दिवसात सोने दरात मोठी वाढ; पाहा काय आहे आजचा भाव…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या