Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांना त्याचा अनेक दिवसांपासून शोध होता. मात्र,काल 31 डिसेंबररोजी वाल्मिक कराड हा स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आलं. (Walmik Karad )
यावेळी आरोपी वाल्मिक कराडबाबत सुनावणी झाली. रात्री उशिरा ही सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर, कराडचे वकील अशोक कवडे यांनी जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद केला.
वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी
अखेर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पवनऊर्जा क्षेत्रातील अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर खंडणीचे आरोप होते. याच प्रकरणी त्याला केज कोर्टात हजर करण्यात आले होते.
2 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर ही सुनावणी झाली. वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची कोठडी मिळाली आहे. (Walmik Karad )
कोर्टात काय घडलं?
वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे व सरकारी वकील एस. एस. देशपांडे कोर्टात दाखल झाले. मात्र, कोर्टात सीआयडीचे वकील म्हणून जे.बी. शिंदे यांनी युक्तिवाद केला. यावेळी सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील हजर होते. सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी 2 कोटींची खंडणी मागीतल्या प्रकरणी तक्रार केली असल्याचं कोर्टात सांगितलं. या अनुषंगाने हत्या आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तपास करण्यासाठी वाल्मिक कराडची कस्टडी हवी असल्याचं सांगत शिंदे यांनी सीआयडीच्या वतीनं 15 दिवसांची सीआयडी कोठडी कोर्टाकडे मागितली. (Walmik Karad )
दरम्यान, सुनावणीच्या वेळी केज कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल 7 पोलीस अधिकारी आणि 47 पोलीस कर्मचारी, 2 RCP प्लॅटून आणि 1 SRP प्लॅटून असा जवळपास 100 ते 125 पोलिसांचा बंदोबस्त यावेळी होता.
News Title : 14 days custody to Walmik Karad
महत्त्वाच्या बातम्या-
नवीन वर्षाचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ!
मुंडेंच्या ‘त्या’ भेटीनंतर कराडचं शरणनाट्य, त्याला लपवून ठेवलं, मोठा खुलासा समोर
“…म्हणून वाल्मिक कराड शरणागती आला”, सुरेश धस यांचा मोठा खुलासा!
वाल्मिक कराडांसोबत असलेल्या व्यक्तीने सांगितला सर्व ठावठिकाणा!
‘दाते पंचांग बघून…’; कराडच्या शरणागतीवर अंजली दमानियांना संशय