महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; भाजप आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ
मुंबई | भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे (Shivsena) 24-25 आमदार पक्षावर नाराज असल्याचं सांगताना प्रसाद लाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला आहे. तर लवकरच आम्ही हे जाहीर करणार असल्याचंही प्रसाद लाड म्हणाले आहेत.
प्रसाद लाड यांनी त्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) देखील निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की, तळमळतंय, जळजळतंय. मात्र, त्यांना आपल्याच पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दूर करता आली नाही. पण त्यांचं चूर्ण आमच्याकडे आहे ते आम्ही योग्य वेळी देऊ, असा टोला देखील लाड यांनी लगावला आहे.
दरम्यान, प्रसाद लाड यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावायला सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे नेमके कोणते खासदार भाजपच्या संपर्कात आहेत याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसे कार्यकर्ते नाराज?, म्हणाले…
“तुम्ही भाजी जरी खरेदी केली तरी भाजप लगेच ईडीला कळवेल”
बुचामध्ये शेकडो मृतदेहांचा खच; ह्रदय पिळवटून टाकणारं दृश्य बघून झेलेन्स्की सुन्न
“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही उद्या म्हणाल मी घराबाहेर पडत नाही तोपर्यंत…”
रशियन सैनिकांची विकृत मानसिकता; धक्कादायक माहिती समोर
Comments are closed.