बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

14 व्या वर्षाच्या मुलीसोबत हैवानासारखं कृत्य, पत्नी देत होती दारावर पहारा

लखनऊ | उत्तर प्रदेशातील रामपूर येथे अतिशय घृणास्पद घटना समोर आली आहे. आपला पती एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत असताना पत्नीनेच दरवाच्या बाहेर पहारा देत असल्याचं समोर येताच संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे आरोपी व्यक्ती हा पीडित मुलीच्या वडिलांचा चांगला मित्र आहे. या घटनेची माहिती पीडितेनं आपल्या आई वडिलांना दिल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे.

होळीच्या दिवशी 14 वर्षांची पीडित मुलगी आपल्या आईबरोबर शेजारच्या घरी गेली होती. होळीचा उत्सव साजरा केल्यानंतर पीडित मुलगी आपल्या आईसोबत घरी परताना आरोपी व्यक्तीनं तिला थांबवून घेतलं. तसेच ती काही दिवस इकडे राहू दे असं तिच्या आईला सांगितलं. दोन्ही परिवारात चांगले संबंध असल्यानं पीडित मुलीच्या आईनंही आरोपीच्या शब्दाला होकार दिला.

पीडित मुलीची आई घरातून निघून गेल्यानंतर, आरोपीच्या पत्नीनं 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आपल्या पतीसोबत एका खोलीत बंद केलं. त्यानंतर आरोपीनं अल्पवयीन मुलीला आपल्या हवसेचं शिकार बनवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान आरोपीची पत्नी घराबाहेर थांबून पहारा देत होती. बलात्कार झाल्यानंतर आरोपी पती-पत्नीनं पीडित मुलीला धमकावून तिला मौन राहण्यास सांगितलं.

दरम्यान, घटनेच्या दोन दिवसानंतर, पीडित मुलीनं रडतच तिच्यासोबत घडलेला गैरप्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर पीडित परिवाराने घटनेची माहिती पोलिसांना देत आरोपी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. यमन खान आणि रुमाना बेगम अशी या आरोपी पती-पत्नीची नावं असून पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कार चालकाने अचानक दरवाजा उघडला, दुचाकीस्वार रस्त्यावर आडवा, भरधाव बसने चिरडलं

…अन् खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कटोरा घेऊन बसले रस्त्यावर

धक्कादायक! जिवंत रुग्णाचा दिला मृत्यू दाखला; निष्काळजीपणाचा कळस

“देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात, पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या”

‘गुरू VS शिष्य’ सामन्यात कोण ठरणार सरस? ; ‘या’ युवा खेळाडूच्या कामगिरीवर लक्ष

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More