बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्भवती असूनही रुग्णांची केली सेवा; नुकतीच आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं घेतला जीव

नवी दिल्ली | दिल्लीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोनाकाळात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरला कोरोनाने जीव गमवावा लागला आहे. डाॅ. शारदा सुमन असं या डाॅक्टरांचं नाव आहे. शारदा या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. कोरोनाकाळात गर्भवती असताना देखील त्यांनी माघार न घेता रुग्णांची सेवा केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. शारदा यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. काही दिवसांनी त्यांची दोन्ही फुफ्फुसं निकामी झाली. शारदा यांना नंतर व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

शारदा यांच्या पतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांच्याकडे आर्थीक मदत मागितली होती. त्यानंतर शारदा यांना योगी आदिनाथ यांच्याकडून दीड कोटींची मदत देण्यात आली होती. मात्र पुफ्फुसं प्रत्यारोपण करण्यासाठी डोनर न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, व्हेंटीलेटरवर असतानाच डाॅक्टरांनी सिझर करुन त्यांची डिलेव्हरी केली. यावेळी शारदा यांनी एका मुलीला जन्म दिला. हैद्राबादमध्ये शारदा यांच्यावर 34 दिवस उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजप खासदाराच्या सुनेचा थेट चाकणकरांना फोन, म्हणाल्या, ‘प्लीज ताई माझी सुटका करा’

“तालिबानशी चर्चा करणारं मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी का बोलत नाही?”

“रोज बारामतीला नोटा पोहच करेल असा गृहमंत्री शरद पवार शोधतात”

राज्यात आज कुठे कुठे पाऊस होणार?, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“तरीही मी कुणाला बलात्काऱ्याची बायको, बलात्काऱ्याची मुलं म्हणून हिणवणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More