बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15 ते 20 आमदार संपर्कात; भाजप नेत्याचा धक्कादायक दावा

भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये 2 दिवसांपासून जोरदार राजकीय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्यातील कलनाथ यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आमदार माझ्या संपर्कात राहतात. काँग्रेस आमदार त्यांची काम करू शकत नाहीत, ते जनतेला उत्तरदायी असल्याने अंसतोष वाढत आहे. 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी थेट माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांच्याकडून काँग्रेस आमदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचाही आरोपही केलेला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभेत 116 बहुमत मिळवण्यासाठी आमदारांची आवश्यकता आहे. अशावेळी काँग्रेसला आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रत्येक आमदार महत्वाचा आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोण अमृता फडणवीस?, त्यांच्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

“भाजप सत्तेसाठी किती हापापलेलं आहे हे मध्य प्रदेशच्या ऑपरेशन लोटसवरून दिसून आलं”

महत्वाच्या बातम्या-

पत्नीच्या हत्येप्रकरणी पती गेला तुरुंगात; 7 वर्षांनंतर पत्नी सापडली प्रियकरासोबत

सामनात आलेल्या ‘त्या’ दोन बातम्या अन् भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस- निलेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More