बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा धक्का!; एकाचवेळी 15 नेत्यांचा पक्षाला रामराम

लक्षद्वीप | भाजपला मोठा धक्का बसला आहे. लक्षद्वीपमध्ये भाजपच्या 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. फिल्ममेकर आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर भाजप नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.

एका टीव्ही शोमधील चर्चेदरम्यान आयशा सुल्ताना यांनी लक्षद्पीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या यावरुन टीका केली होती. यानंतर आयशा सुल्तानावर कावारत्ती पोलीस स्टेशनमध्ये राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला. आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचं पाऊल उचललं आहे. एएएनआयने या संदर्भातलं वृत्तं दिलं आहे.

राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप राज्य सचिव अब्दुल हामिद मुल्लीपुरा, वक्फ बोर्डाचे सदस्य उम्मुल कुलूस पुथियापुरा, खादी बोर्डाचे सदस्य सैफुल्ला पक्कियोडा, जाबिर सलीहथ मंजिल आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्हाला यावर आक्षेप आहे आणि आम्ही आमचा राजीनामा देत आहोत, असं भाजपचे राज्य सचिव अब्दुल हामिद यांनी सांगितलंय.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचंड यश मिळवत सत्ता राखली आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा घरवापसी करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेल्या मुकूल रॉय यांनी घरवापसी केली.

थोडक्यात बातम्या- 

“…हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी”

‘…म्हणून इतक्यात पेरणी करू नका’; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका

‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा

केंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More