बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”

मुंबई | राज्यातील राजकारणात राणे घराण्याचं एक वेगळं स्थान आहे. शिवसेना आणि राणे यांच्यातील राजकीय वैर साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. शिवसेनेवर टीका करण्याची एक संधी राणे परिवार सोडत नाही. मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे. आमदार नितेश राणे हे सध्या मुंबई महानगरपालिकेच्या कामावर खूप लक्ष देऊन आहेत.

मुंबईतील राणी बाग ही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. राणीच्या बागेमध्ये विविध प्राणी आणण्याचा आणि त्यांचं संवर्धन करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस असतो. मुंबई महानगरपालिकेने राणी बागेत पेंग्वीन आणले आहेत. या पेंग्वीन संवर्धनासाठी महानगरपालिका तब्बल 15 कोटी रूपये खर्च करत असल्याचं समोर आलं आहे. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नितेश राणे यांनी पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केलीये, हे अत्यंत निंदनीय आहे. या शब्दात नितेश राणे यांनी पेडणेकर यांना पत्र लिहून टोला लगावला आहे. जर वाघांची देखभाल महानगर पालिकेचे कर्मचारी करू शकत असतील तर पेंग्वीनची देखभाल का करू शकत नाहीत? 15 कोटींचा देखभालीचा ठेका कोणासाठी?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

पेंग्वीनच्या मुद्द्यावरून पुन्हा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्ह दिसत आहेत. नितेश राणे यांच्या पत्राने मुंबईच्या महापौर यांना राणे यांच्याकडून पुन्हा लक्ष करण्यात आलं आहे. राणी बागेतील पर्यटकांची संख्या कमी होत असताना मुंबईच्या महापौर अवास्तव खर्च करत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या 

केंद्र सरकारची पशुपालकांसाठी मोठी घोषणा, ‘इतके’ लाख जिंकण्याची संधी

वानवडी बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

“नेहरु असतानाच हिंदू मारले गेले, देवाचे आभार माना की RSSचा जन्म झाला”

…तर दर महिन्याला मिळेल दहा हजार पेन्शन; पती-पत्नीसाठी सरकारची बंपर योजना

“…तरच प्रेक्षकांना आयपीएल पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More