कृषी मंत्रलयाकडून 15 कोटी वसुलीचे टार्गेट; अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ

मुंबई | कृषीमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या मतदारसंघात 1 ते 10 जानेवारी दरम्यान सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना 15 कोटी रूपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

यानंतर विधानसभेत विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. तसेच अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या कूपनमध्येही वेगवेगळी कॅटॅगरी आहेत, कृषीच्या दुकानदारांकडूनही बेकायदेशीर रक्कमेची मागणी होत आहे आणि हे लोकशाही धक्का देणारं कृत्य आहे. सगळ्या नियमांची पायमल्ली केली जात आहे, त्यामुळं आम्ही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करतो, असं विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) विधान सभेत म्हणाले आहेत.

आम्ही विधानसभेत सत्तार यांच्या विरोधात पुरावे सादर केले आहेत. तसेच हायकोर्टानं देखील सत्तारांच्या विरोधात ताशेरे ओढले आहेत, त्यामुळं सत्तारांना पदावर बसण्याचा अधिकार राहिलेला नाही, असं अजित पवार नुकतेच माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान,सत्तारांनी आयोजन केलेल्या या महोत्सवासाठी छापण्यात आलेली कूपन विकण्याची जबाबदारीही कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आल्यानं अधिकारी मोठ्या तणावाखाली आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या