सांगली | सांगलीतील चक्क 16 लाखांचा बकरा चोरीला गेला आहे. आटपाडीमधील उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारातील प्रसिद्ध मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेला हा बकरा त्यावेळी चर्चेचा विषय ठरलेला.
शनिवारी पहाटे 16 लाख रूपये किंमत असलेल्या या प्रसिद्ध बकऱ्याची चोरी झालीये. सांगोला तालुक्यातील चांडोलवाडीमधील बाबुराव मेटकरी यांचा हा मोदी नावाचा बकरा आहे.
सांगलीतील हा मोदी नावाचा बकरा राज्यभर प्रसिद्ध आहे. आटपाडीतील जनावरांच्या बाजारात या मोदी बकऱ्याची किंमत तब्बल दीड कोटी होती. तर या बकऱ्याला तब्बल 70 लाखाची मागणी होती.
मात्र आज सकाळी पहाटे हा बकरा चोरीला गेल्याची घटना घडलीये. एका आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याची माहिती आहे.
थोडक्यात बातम्या-
…अन् फॅनच्या फूड स्टॉलला सोनू सूदने दिली सरप्राईज विझीट!
मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ‘या’ कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं!
विराट कोहली नाही तर ‘हा’ ठरलाय सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!
लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!