छत्तीसगड | सीआरपीएफ-डीआरजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण आलं आहे. शनिवारी रात्री सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन अंर्तगत असणाऱ्या बुर्कापाल जंगलात सीआरपीएफने कोंबिंग ऑपरेशन सुरु केलं.
नक्षलवाद्यांनी कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या 150 जवानांवर अचानक हल्ला केला. यानंतर पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. नक्षलवाद्यांशी लढताना 14 जवानही जखमी झालं.
सीआरपीएफ आणि आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर सुरुवातीला 13 जवान बेपत्ता होते. मात्र शोध मोहिमेत त्यांचे मृतदेह सापडले.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस जवानांवर रायपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
खासदारांनो दिल्लीला जाऊ नका, महाराष्ट्राला तुमची गरज आहे- शरद पवार
“महाराष्ट्रात 144 लागू… कोरोना आता गुणाकार करेल मात्र लोकांनो आपल्याला वजाबाकी करायचीये”
महत्वाच्या बातम्या-
जनता कर्फ्यू सकाळी 5 वाजेपर्यंत वाढवला गरज पडल्यास 31 मार्चपर्यंत वाढवणार!
VVIP उपचारांसाठी कनिका कपूर घालतेय डाॅक्टरांशी हुज्जत
जनता कर्फ्यूदरम्यान रस्त्यावर भटकणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या
Comments are closed.