बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थ सोबतच्या आठवणी सांगताना विद्युत जामवालला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

मुंबई | 2 सप्टेंबर रोजी अभिनेता तसेच ‘बिग बाॅस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्लाने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अशातच बाॅलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने 18 मिनटांचा व्हिडीओ शूट करुन सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे.

सिद्धार्थ आणि विद्युत दोघे चांगले मित्र होते. त्यामुळे सिद्धार्थच्या जाण्याने विद्युतला मोठा धक्का बसला आहे. विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक 18 मिनटांचा व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये प्रथम त्याने एक शांती श्लोक म्हणून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विद्युतने सिद्धार्थसोबतच्या त्याच्या आठवणींना उजाळा दिलाय.

आपल्या सोबतच्या सिद्धार्थच्या आठवणी सांगताना विद्युतला अनेक वेळा त्याचे अश्रू अनावर झाले. यावेळी त्याने त्याची आणि सिद्धार्थची ओळख 2004 मध्ये मुंबईमध्ये झाली असल्याचं सांगितलं. तसेच 15 जुलैला त्यांची शेवट भेट झाल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थचं त्याच्या आईवर प्रचंड प्रेम होतं, ते प्रेम पाहून मला त्याचा हेवा वाटायचा असं देखील विद्युतने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. आपली पहिली भेट झाली तेव्हा सिद्धार्थने जे कपडे घातलेले ते मी कधीच विसरु शकणार नाही, असं देखील विद्युतने म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

थोडक्यात बातम्या-

“ब्राह्मणांचा कायमच वापर झाला, शिवाजी महाराज सुद्धा ब्राह्मणच होते”

‘…अन् 100 प्रवाशांनी भरलेली बोट क्षणात आडवी झाली’; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहे – धनंजय मुंडे

अफगाणिस्तानमध्ये ‘या’ गोष्टीसाठीही घ्यावी लागणार परवानगी; ‘हे’ नियम ऐकून थक्क व्हाल

एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते- ईडी कोर्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More