बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; रस्त्याच्या कडेला बसलेल्या 18 कामगारांचा मृत्यू

लखनऊ | उत्तर प्रदेशच्या बाराबांकी येथे भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बसला वेगाने आलेल्या ट्रकनं धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात बसमधील आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या 19 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत.

लखनऊ-अयोध्या महामार्गावर कल्याणी नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. जखमी झालेल्या सर्वांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृत आणि गंभीर झालेले सर्व लोक हे मजूर असल्याचं कळतंय.

पुलावर डबल डेकर बस बंद पडली होती. बस बंद पडल्याने रस्त्याच्या शेजारी चालकाने ती उभी केली होती. याच दरम्यान मागून आलेल्या भरधाव ट्रकने बसला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर 7 प्रवाशांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून भारतीय व्यक्तींचं स्वीस बँकेमधील गौडबंगाल कधी उघडकीस येत नाही”

‘या’ महिन्यापासून लहान मुलांना मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र; केलं ‘ही’ मोठी मागणी

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना दिलासा; करणार इतक्या हजार कोटींची मदत

‘या’ लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…; अभ्यासातून चिंताजनक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More