बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानवरून आलेल्या त्या 180 वऱ्हाड्यांनी वाढवलं पालघरचं टेंशन; इतक्या जणांना कोरोनाची लागण

पालघर | पालघरमधील एका बड्या व्यावसायिकाच्या मुलाच्या लग्नासाठी राजस्थानला गेलेल्या 180 जणांपैकी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्यांमध्ये पालघर नगरपरिषदेच्या 2 नगरसेवकांचाही समावेश आहे.

पालघरमधील बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या मुलाचे डेस्टिनेशन वेडिंग राजस्थान येथे आयोजित केले होते. या सोहळ्यासाठी पालघरमधून खासगी विमानाने 180 वऱ्हाडी नेण्यात आले व त्यांची सोय राजस्थानच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती.

लग्न सोहळ्यादरम्यान सर्व जण एकत्रच असल्याने संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे तहसीलदार सुनील शिंदे यांनी सर्व 180 जणांना तात्काळ कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांच्या आदेशाप्रमाणे कोरोना चाचणी सर्वांना बंधनकारक करण्यात आली असून जर कोणी चाचणी केली नाही, तर त्याच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

या सर्वांमध्ये नगरसेवक आणि प्रतिष्ठित वकिलाचा समावेश असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच आता संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान एकूण 7 नगरसेवक या सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि त्यापैकी 2 जणांना कोरोना झाला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना शासनाने अनेक निर्बंध लागु केले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी धार्मिक कार्यक्रम, लग्नसोहळे यांच्यावरतीही मोठ्या प्रमाणात बंधने आली असताना डेस्टिनेशन वेडिंगसाठी एवढ्या लोकांना एकत्र करून बड्या व्यावसायिकाने राजस्थानला नेल्याने आता प्रशासन यासंदर्भात कारवाई करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत’; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

पोलीस आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून महसूल विभागातील एका अधिकाऱ्याची आत्महत्या

‘गरज पडल्यास संपर्क साधा’; मोबाईल नंबर देत नवऱ्याने गावात स्वत:च्याच बायकोचे लावले पोस्टर्स

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दाखवून देऊ; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

स्टंट करत गाडीवरच सुरू झाला रोमान्स अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More