Top News अहमदनगर महाराष्ट्र

अबब… तब्बल 55 वर्षांपासून ‘या’ गावात एकाच घरातील माणूस होतोय सरपंच

Photo Courtesy- Facebook/Vishal Bhapkar

अहमदनगर | पाथर्डी तालुक्यातील आदर्श गाव अशी ओळख असलेल्या आणि विविध ग्राम-पुरस्कार विजेत्या लाेहसरे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 55 वर्षाँपासुन सलग सत्ता कायम ठेवत येथिल गिते पाटील कुटुंबाने नवा इतिहास रचला. गिते पाटील कुटुंबाचाच सदस्य गेल्या पाच दशकांहुनही अधिक काळ लाेहसरे ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करतो आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर हिरा अनिल गिते यांची लोहसरेत दुसऱ्यांदा सरपंचपदी वर्णी लागली आहे. याआधी त्यांचे पती अनिल गिते 5 वर्ष तसेच, अनिल यांचे वडिल 15 वर्षे, तर आजोबा तब्बल 25 वर्षे सरपंचपदावर कार्यरत होते. लोहसरे ग्रामपंचायतीत गिते पाटील यांच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने 9 पैकी 5 जागा जिंकत यंदाही आपला बालेकिल्ला अजिंक्य ठेवला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील कदाचित हे खुप दुर्मिळ उदाहरण असेल.

दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान झालेल्या हिरा गिते यांनी सध्या सुरु असलेल्या कामांची गती भविष्यात वाढवुन सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे विजयानंतर बोलतांना सांगितले. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील कदाचित हे खुप दुर्मिळ उदाहरण असेल.

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या सरपंच आरक्षण सोडतीच्या निर्णयाविराेधात याआधी उच्च ऩ्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करतांना आरक्षण सोडतीमध्ये अनियमितता दिसून येत असल्यामुळे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर या जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकांना पुढिल सुनावणी पर्यंत तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी

धक्कादायक…. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप

बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचं महत्त्वाचं पाऊल

भाजप खासदार असताना मोदींशी पंगा; आता ‘या’ काँग्रेस नेत्याचं थेट वाराणसीत आव्हान!

5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या