मुंबई | रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी हल्ल्याचे आदेश दिल्यानंतर रशिया-युक्रेन वाद अधिक तीव्र झाला. रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस भयानक रूप घेत आहे. त्यात हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी आतोनात प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं. रोमानियाची राजधानी बुचारेस्टवरून विद्यार्थी आज मायदेशी परतले. ऑपरेशन गंगा अंतर्गत 182 विद्यार्थी मुंबईत उतरले. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विमानतळावर हजेरी लावली.
नारायण राणे यांनी विमानात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक मायदेशी परत येत आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत हजारो नागरिकांना मायदेशी आणण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी 7.20 वाजता रोमानियावरून निघालेलं विमान मुंबईत दाखल झालं. मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नारायण राणेही मुंबई विमानतळावर दाखल झाले. मायदेशी परतलेल्या 182 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 24 जणांचा समावेश आहे. मायभूमीत परतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.
थोडक्यात बातम्या-
डायबिटीज पेशंट असाल तर ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश, शुगर राहिल कंट्रोलमध्ये
रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला, सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला
अमेरिकेकडून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न, भडकलेल्या पुतिन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“डॉक्टर नालायक हरामखोर आहेत, ते मारखाण्याच्या लायकीचे आहेत”
खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या
Comments are closed.