पुणे | मराठा समाजाने आरक्षणासाठी काल महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पुण्यातील महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले. पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली असून 185च्यावर आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
बंद दरम्यान पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाचे नुकसान करण्यात आले. चांदणी चौकात मराठा आंदोलकांनी हिंसक भूमिका घेत दगडफेक केली. तसंच डेक्कनला आक्रमकतेने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यासर्व प्रकरणी बंडगार्डन आणि कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत 7 पोलिस जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार
-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे
-शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा तरुणाला बेदम मारहाण
-मराठा मोर्चेकऱ्यावर धावून जाणाऱ्या अंबादास दानवेंना मोर्चेकऱ्यांनी हुसकावून लावलं
-राज्यात पेटलेल्या मराठा वणव्यास सरकारच जबाबदार- विखे-पाटील