बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे ‘या’ महापालिकेतील तब्बल 19 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अहमदनगर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. मधल्या काळात कोरोना आटोक्यात आला असतानाच कोरोनाची दुसरी लाट सक्रिय झाली आणि पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेकांना अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे नाहक प्राण गमवावा लागला. तसेच काही जणांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून काम करताना देखील कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहमदनगर महानगरपालिकेतील तब्बल 19 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या लाटेत अहमदनगर पालिकेतील फक्त 3 कर्मचारी कोरोनामुळे मृत पावले पण दुसऱ्या लाटेने अहमदनगरमध्ये हाहाकार माजवला असतानाच पालिकेतील फ्रन्टलाइन वॉरियर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आणि तब्बल 16 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच दोन कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे यापूर्वीच पाठवण्यात आले असून उर्वरित प्रस्तावही लवकरच पाठवण्यात येतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पालिका कर्मचारी हे फ्रन्टलाइन वर्कर म्हणून काम करत असताना त्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने शासनाच्या मदतीसाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

हाय अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा; पुढचे 2 दिवस धोक्याचे

फायनलपुर्वी न्यूझीलंडला दुसरा मोठा धक्का; कर्णधार केन विल्यमसन दुखापतग्रस्त

श्रुती मराठेचा ‘पुण्याची मैना’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

आश्चर्यच! 24 हजार वर्षापुर्वीचा ‘तो’ जीव पुन्हा जिवंत झाला; जगभरातील शास्त्रज्ञही चकीत

सकारात्मक बातमी! देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More