१९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

मुंबई | १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकृती अस्वस्थामुळे आज पहाटे त्याला मुंबईतील जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ताप आणि छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर त्याला मध्यरात्री जे.जे.मध्ये हलवण्यात आलं होतं. तिथं जेल विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, बॉम्बस्फोटांचा कट आखणार्‍या मुस्तफाला २००४ मध्ये दुबई पोलिसांनी अटक करुन भारताच्या हवाली केलं होतं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या