पुणे | मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही, ते आम्ही देणारच आहोत, असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं, ते मराठा मोर्चेकऱ्यांशी बोलत होते.
मराठा मोर्चेकऱ्यांच्यावतीने पुण्यात आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी बापटांनी मोर्चेकऱ्यांना आश्वासन दिलं.
दरम्यान, आरक्षण मिळाल्यानंतर न्यायालयीन लढाईची वेळ आली तर प्रकरणा न्यायालयात टिकावे यासाठी राज्य सरकार सर्व काळजी घेत आहे. त्या संपूर्ण प्रक्रियेसाठी हा वेळ लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-2019 च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ!
-शिवरायांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला आला आणि सही करून गेला!
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; मोर्चेकऱ्यांची सरकारला डेडलाईन!
-मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या!
-आमदारांच्या घरासमोरील मराठ्यांचं ठिय्या आंदोलन म्हणजे स्टंटबाजी!
Comments are closed.