1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती!

पुणे | नियम वेशीवर बांधणाऱ्या पुणेकरांसाठी पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. 

पुण्यात अपघातांंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

न्यायालयाने आधीच हेल्मेटसक्तीचा निर्णय दिला होता. मात्र पुण्यात त्याला विरोध करण्यात आला होता. पुण्यातील नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, हेल्मेटमुळे मान दुखते, केसांचे त्रास होतात. आजूबाजूचे दिसण्यात अचडण येते. त्यासोबत आधी वाहतूक नियोजन आणि रस्त्यांची स्थिती सुधारा, असे सल्ले पुणेकरांनी दिले होते. त्यामुळे पुणेकर आता या निर्णयाला कसे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!

-दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

-विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट