उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…; शिंदेंसमोर दिल्लीत भाजपाने ठेवल्या ‘या’ 2 मोठ्या ऑफर्स?

Eknath Shinde | राज्यभरात सध्या दिल्लीतील बैठकीची चर्चा रंगते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये काल 28 नोव्हेंबररोजी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार तसेच मंत्रीमंडळ बाबतही चर्चा झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अगोदर सीएम पदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, नंतर त्यांनी मोदी-शाह यांचा निर्णय मान्य असेल असं म्हणत सीएम पदासाठी आपलं नाव मागे घेतलं.

अशात दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं याबाबत वगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. मिळालेल्या महितीनुसार, दिल्लीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपाने दोन मोठ्या ऑफर्स ठेवल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीमध्ये भाजपाने काही मुद्दे शिंदे आणि अजित पवारांना अगदी स्पष्टपणे सांगितल्याचंही समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर्स?

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर 12 मंत्रिपदांची मागणी केली असल्याचं म्हटलं जातंय. विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे. तसेच गृहमंत्रीपद देखील आपल्या वाट्याला यावं यासाठी शिंदे गट आग्रही आहे. तसेच पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, असंही शिंदे यांनी अमित शाह यांना सांगितल्याचं म्हटलं जातंय. (Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांच्या मागणीनंतर भाजपाने त्यांना दोन मोठ्या ऑफर दिल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना पहिला पर्याय उपमुख्यमंत्री होण्याचा देण्यात आला आहे. तर दुसरा पर्याय हा केंद्रामध्ये मोठं कॅबिनेट पद स्वीकारावं असं भाजपकडून सांगण्यात आल्याचं समजतंय. तसेच, दिल्लीमधील बैठकीनंतर मुंबईतही महायुतीची बैठक होणार असून त्यात निर्णय होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते काल प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

मुंबईत होणार महायुतीची बैठक

दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील मंत्रिमंडळासंदर्भात आपले प्रस्ताव केंद्रीय नेत्यांसमोर ठेवला आहे. राष्ट्रवादीला अर्थखातं, सहकार खातं, कृषी, अन्न-नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत-पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा ,महिला व बाल कल्याण खातं दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत कोणतीच घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष राहील. (Eknath Shinde)

News Title : 2 big offers from bjp to Eknath Shinde 

महत्वाच्या बातम्या –

‘ते’ वादग्रस्त प्रकरण भोवणार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा वाढ

सत्ता स्थापनेपूर्वीच तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर!

लाडक्या बहीणींनो डिसेंबरचा हप्ता ‘या’ दिवशी येणार?, मोठी माहिती समोर

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात रक्त गोठवणारी थंडी पडणार?

महायुतीच्या मंत्रीमंडळात ‘या’ महिला आमदारांची लागणार वर्णी?