फडणवीसांना मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवार गटाच्या मार्गावर?

Sharad Pawar Group | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामुळे विधानसभेपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसू शकतो. (Sharad Pawar Group)

कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

समरजीत घाटगे भाजपला करणार रामराम?

कोल्हापूर येथे अजित पवार गटाकडून मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, समरजित घाटगे या जागेवरून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. मात्र, ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला गेली तर, समरजित घाटगे हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.(Sharad Pawar Group)

दुसरीकडे, इंदापूरमध्ये देखील अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवात प्रवेश करून निवडणूक लढवतील, असं म्हटलं जातंय. याबाबत अधिकृत अशी कोणतीच प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली नाही. मात्र, राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा आहेत.

हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात

उद्या 21 ऑगस्टरोजी महायुतीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला देखील भाजप नेते समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ते शरद पवार गटात जाणार, अशी चर्चा आहे.(Sharad Pawar Group)

त्याचबरोबर इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचपणी सुरु आहे. ही जागा देखील अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील मोठा निर्णय घेऊ शकतात, असं म्हटलं जातंय.

News Title –  2 BJP Leaders in Contact with Sharad Pawar Group

महत्त्वाच्या बातम्या-

“माझी पोलीस सुरक्षा काढून घ्या आणि..”; सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मोठी मागणी

चाहत्यांना धक्का, सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या 2 महिन्यातच घेतला मोठा निर्णय

“त्या राक्षसाला शिवकाळातील चौरंगाची शिक्षा..”; बदलापूर प्रकरणी रितेश देशमुखची मागणी

संतापजनक! बदलापूरनंतर अकोल्यात 6 मुलींचा लैंगिक छळ, वर्गशिक्षकानेच केलं असं काही की..

आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प?, जाणून घ्या सविस्तर