बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुकेश अंबानींकडून बद्रीनाथ आणि केदारनाथाच्या चरणी 2 कोटी रुपये

डेहराडून | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रविवारी बद्रीनाथ आणि केदारनाथचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी चंदन आणि पुजा सामग्रीसाठी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिराकडे प्रत्येकी 1-1 कोटीचे दान केले.

मुकेश अंबानी हे सकाळी 9 वाजता बद्रीनाथ येथे पोहोचले. यावेळी मंदिर समितीचे कार्याधिकारी बी.डी.सिंह आणि भुवनचंद्र उनियाल यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मुकेश अंबानी यांनी गीता पठणात सहभाग घेऊन देशवासींयांसाठी प्रार्थना केली.

मंदिरात वापरले जाणारे हे चंदन मुकेश अंबानी यांचे वडील आणि रिलायंन्स इंडस्ट्रिजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या नावे खरेदी केले जाणार आहेत.

दरम्यान, मंदिरात वापरले जाणारे चंदन हे तामिळनाडूतील जंगलामधून खरेदी करण्यात यावे, अशी विनंती मुकेश अंबानी यांनी मंदीर समितीला केली.

महत्वाच्या बातम्या

-‘बिगबॉस मराठी 2’चं ग्रँड प्रिमिअर; किशोरी शहाणेसोबत ‘या’ कलाकारांचा घरात प्रवेश

-मुस्लीम तरुणाला ‘जय श्री रामा’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती

-लाच घेणााऱ्या पोलिसांना आता दाखवला जाणार कायमचा घरचा रस्ता

-‘काँग्रेसला आधार’ देण्याचा आम्ही इजारा उचललेला नाही- प्रकाश आंबेडकर

-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More