Top News पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यासाठी ‘इतक्या’ कोरोना लसीच्या डोसची गरज- डाॅ. राजेश देशमुख

पुणे | पुणे जिल्ह्यासाठी दोन टप्प्यात लसीकरण करण्यासाठी तब्बल 2 लाख 23 हजार कोरोना डोस लागणार आहेत. परंतु पुणे जिल्ह्याला नक्की किती डोस मिळणार हे बुधवारी मुंबईत होणा-या आढावा बैठकीनंतर निश्चित होईल, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली.

16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार असून शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील करोना लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्व खाजगी व सरकारी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

यामध्ये शहर आणि जिल्ह्यात तब्बल 1 लाख 10 हजार 434 कर्मचाऱ्यांना या लसीचा लाभ देण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यात एकूण 55 केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये ग्रामीण भागात 23, पुणे महापालिका परिसरात 16 आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात 16 केंद्राचा समावेश आहे.

शासनाच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणामध्ये 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात शहर, ग्रामीण भागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात आजारी असलेल्या आणि वयोवृद्धांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील- काँग्रेस

पहिल्या टप्प्यात 55 टक्के लाभार्थींना मिळणार लस!

मुंबईतील शाळा, कॉलेजची दारं जानेवारीच्या ‘या’ तारखेला होणार खुली???

“धनंजय मुंडे प्रकरणात सरकारवर कोणताही दबाव नसून मुंडेंवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही”

‘…अन्यथा मंत्रिपद सोडायला तयार’; वडेट्टीवारांनी हाय कमांडकडे केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या