शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मिळणार 2 लाख; ‘या’ नेत्याने केली घोषणा

मुंबई | कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल नेते एचडी कुमारस्वामी (H.D Kumarswami) यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या महिलांना आमच्या पक्षाकडून दोन लाख रुपये दिले जातील, असं त्यांनी कोलारमधील ‘पंचरत्न’ रॅलीला संबोधित करताना जाहीर केलंय.

शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मुलींना दोन लाख रुपये द्यावेत. आमच्या मुलांच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाईल, असं त्या म्हणाल्यात.

कर्नाटकात एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होतील. अशात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध घोषणा करण्यात येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-