बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त 12 रुपयांत 2 लाखांचा विमा; मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत सहभागी झालात का?

नवी दिल्ली | अचानक एखाद्या दुर्घटनेमुळे आर्थिक ताण येऊ नये आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि कुटुंबीयांनाही आर्थिक मदत मिळावी, यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत फक्त 12 रुपये प्रीमियम देऊन 2 लाखांपर्यंतचा विमा लाभार्थी मिळवू शकतो. वर्षाकाठी फक्त 12 रुपये देऊन 2 लाखांचा विमा देणारी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजने अंतर्गत विमा धारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबीय किंवा वारसदाराला 2 लाख रुपये पूर्ण मिळतील. त्याचबरोबर अपघात होऊन जर विमाधारक अर्धवट अपंग झाला तर त्याला 1 लाख रुपये देण्यात येतील आणि तो पूर्ण जर अपंग झाला तर त्याला पुर्ण 2 लाख रुपये दिले जातील.

या योजनेचा फायदा 18 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतच्या वयोगटातील भारतातील सर्व नागरिक घेऊ शकतात. तसेच बँक खात्यातून दरवर्षी 12 रुपयांचं प्रिमियम वजा करण्यात येतं आणि आपण या योजनेचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी पॉलिसीधारकाचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत खाते असणे गरजेचं आहे. त्याबरोबरच बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून या योजनेचा फॉर्म भरायचा आणि आधार कार्ड व बँक पासबुक यासह वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटोसह बँकेतही देऊ शकतो किंवा ऑनलाईनही अर्ज करू शकतो.

या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी https://jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx  या संकेतस्थळाला भेट देऊनही आपण नोंदणी करू शकता. आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जर आपण या योजनेत सहभाग घेतला नसेल तर लवकरात लवकर अवघ्या 12 रुपयात 2 लाखांपर्यंतचा विमा मिळणाऱ्या या केंद्र सरकारच्या योजनेत लवकर सहभाग नोंदवा.

थोडक्यात बातम्या – 

…अन् चक्क स्मशानभूमी बाहेर हाऊसफुल्लचा फलक; कोरोनामुळे विदारक परिस्थिती

दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू, वृद्ध आई-बापाचा टाहो ऐकून सारं गाव सुन्न

“…अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”

देव माणूस!! नो लिमिट’ योजनेअंतर्गत टाटांची 2000 कोटींची गुंतवणूक

दिलासादायक! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More