बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्राकडून गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज; वादळातील बळींच्या कुटुंबीयांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर

अहमदाबाद | तौक्ते वादळामुळे गुजरात आणि दीव दमणचं मोठं नुकसान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते. यावेळी त्यांनी राज्याला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येत असल्याचं मोदींनी जाहीर केलं.

वादळातील बळींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजाराची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्याशिवाय केंद्र सरकार गुजरातमध्ये इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप पाठवेल. हा ग्रुप राज्यातील नुकसानीची पाहणी करून केंद्राला त्याची माहिती देईल, असं मोदींनी सांगितलं.

चक्रीवादळामुळे गुजरात आणि दीवचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे या भागांची पाहणी केली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व राज्यांसोबत केंद्र सरकार काम करत आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व राज्यांना केंद्राकडून लवकरच मदत करण्यात येणार असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

दरम्यान, वादळामुळे गुजरातमध्ये 40 हजार वृक्ष उन्मळून पडले आहेत. 16,500 कच्ची घरेही पडली आहेत. 2400 हून अधिक गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटले आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार’; राजेश टोपेंची मोठी घोषणा

कोरोना लसीकरण नियमात मोठे बदल; वाचा सरकारने जारी केलेले नवे नियम

‘पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा’; खासदार प्रीतम मुंडेंचं मोदींना पत्र

“सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही”

“मोदी गुजरात दौऱ्यावर तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More