महाराष्ट्र मुंबई

परेलमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत 16 जण जखमी तर चौघांचा दुर्दैवी अंत

मुंबई | मुंबईतील परेलमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काहींची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. 

टॉवरच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली असून हा रहिवासी मजला असल्याने या आगीत लोक अडकल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र आता आलेल्या वृत्तानुसार आगीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तर चार जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

दरम्यान, आगीत अडकलेल्यांना क्रेनच्या सहाय्याने वाचवण्याचा अग्नीशामक दल प्रयत्न करत आहे. त्यासाठी अग्नीशामक दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना

-परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग; पाहा काय काय घडतंय…

-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत काळाच्या पडद्याआड

-पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ व्हीडिओवर एक रुपयाही खर्च नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या