बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारतीय संघातील ‘हे’ 2 खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी’- डेव्हिड वॉर्नर

मुंबई |  18 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आता लागलं आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या टेस्ट मॅचबद्दल अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांचा अंदाज सांगितला आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक बॅट्समन डेव्हिड वॉर्नर यानं देखील फायनलबद्दल भाकीत केलं आहे. त्यानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय संघानं कोणत्या खेळाडूंसह उतरावं हे सांगितलं आहे.

टीम इंडियातील रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या दोघांनीही खेळावं असा सल्ला वॉर्नरनं दिला आहे. जडेजाबद्दल सांगताना वॉर्नर म्हणाला की,’डावखुरा स्पिनर असलेला जडेजा एका विशिष्ट उंचीनं सातत्यानं बॉलिंग करु शकतो. जडेजानं डावखुऱ्या बॅट्समनच्या विरुद्ध चांगली बॉलिंग केलेली आहे. ते दोन्ही स्पिनर न्यूझीलंडवर भारी पडतील, असं मला वाटतं’.

टीम इंडिया देखील सध्या या फायनलची जोरदार तयारी करत आहे. या फायनलसाठी भारतीय टीम साऊथम्पटनच्या एजिस बाऊलमध्ये इंट्रा स्क्वाड मॅच खेळत आहे. सराव मॅचच्या तिसऱ्या दिवशी जडेजानं जोरदार बॅटींग केली. गेल्या काही महिन्यांपासून जडेजानं सराव मॅचचा तिसरा दिवस गाजवला आहे. टीम इंडियाचं संतुलन राखण्यासाठी रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या दोघांचा सहभाग निश्चित मानला जात आहे. बॉलिंग प्रमाणेच बॅटींगमध्येही हे अनुभवी खेळाडू उपयुक्त आहेत. मात्र साऊथम्पटनचं हवामान आणि पिच फास्ट बॉलिंगला मदत करणारी आहे.

दरम्यान, न्यूझीलंडचा संघही याच कारणामुळं फायनलमध्ये 4 फास्ट बॉलर्सना घेऊन खेळणार हे नक्की आहे. टीम इंडियाकडेही इशांत, शमी, बुमराह आणि सिराज हे 4 अव्वल फास्ट बॉलर्स आहेत. त्यामुळे या चौघांना खेळवण्यासाठी जडेजा आणि अश्विन यापैकी कुणाची निवड करावी हा विराटसमोरचा मोठा प्रश्न आहे.

थोडक्यात बातम्या –

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारात, पाहा आकडेवारी

नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तलावात 500च्या नोटा तरंगताना दिसल्या, नंतर झालं असं काही की…

फेसबुक लाईव्ह करत रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! उदयनराजे आणि संभाजीराजेंची होणार पुण्यात भेट ‘या’ विषयावर होणार चर्चा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More