बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अलिबाग कारागृहात अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी 2 पोलीस निलंबित

रायगड | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलीये. यावेळी जेलमध्ये असताना गोस्वामी यांना फोन पुरवल्याची गोष्ट समोर आली होती.

दरम्यान अर्णब गोस्वामी यांना फोन पुरवल्याच्या प्रकरणात 2 कारागृहातील पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खातेनिहाय चौकशी नंतर ही कारवाई करण्यात आलीये.

अटक झाल्यानंतर अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना अलिबाग कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. कारागृहाच्या विलगीकरण कक्षात अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल फोनचा वापर केल्याचं समोर आलं होतं. यानंतर या तिन्ही आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आलेली.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल कसा आला या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचंही कारागृहाचे अधिक्षक ए.टी. पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीवर मुंबई भारी; पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्राॅफी

‘विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं’; तेजस्वी यादव यांचा खळबळजनक आरोप

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More