बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मानवी केसांनी भरलेले 2 ट्रक जवानांनी पकडले, एक किलो केसांची किंमत ऐकून थक्क व्हाल

आयझाॅल | आतापर्यंत आपण सोनं, चांदी, हत्तीचे दात, वाघाच्या कातड्याची तस्करी होत असल्याच्या घटना ऐकल्या असतील. परंतू तुमच्या केसाची तस्करी होत असल्याचं ऐकलंय का? भारताच्या मेझोराम राज्यातून म्यानमारमध्ये केसांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मानवी केसांंनी भरलेले 2 ट्रक आसाम रायफल्सच्या जवानांनी पकडले आहेत.

तब्बल 2 कोटी रूपये किंमत असलेले हे दोन ट्रक आसाम रायफल्सच्या सेरचीप बटालियनने चंपाई जिल्हात पकडले गेले आहेत. यासाठी त्यांनी कस्टम विभागाची मदत घेऊन ही कारवाई केली आहे. आंध्र प्रदेशातील तिरूपती मंदिरातून ही केसं गोळा करून मेझोराम येथे पाठवण्यात येतात. तिथून त्यांची तस्करी म्यानमारमध्ये करण्यात येते.

म्यानमार मध्ये या केसांवर प्रकिया करून चीन मध्ये विग बनवण्यासाठी पाठवण्यात येतं. त्यानंतर हे विग भारतासोबतच इतर देशात विकण्यासाठी पाठवलं जातं. आसाम रायफल्सच्या या कारवाईत 120 बॅगमध्ये भरलेले 50 किलो केस पकडण्यात आले. त्याची किंमत सुमारे 2 कोटी रूपये इतकी आहे.

दरम्यान, भारत आणि म्यानमार मध्ये कोणतीही दर्शनी सीमा नाही. या दोन्ही देशांच्या सीमा खुल्या आहेत. या भागातून आधी ड्रग्स, सोने, चांदी यांसारख्या वस्तूंची तस्करी होत होती. आता या भागातून केसांची तस्करी होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या- 

मलायका अरोराचा हॉट अंदाज; शेअर केला जीममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ, पाहा व्हिडीओ

“नागपुरात जन्म घेतलेली संघटना…”; राहुल गांधींची संघावर बोचरी टीका

“इतरांना तुच्छ लेखण्याचा महाजनांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला”

‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप

डोक्यात कोयत्याने वार करत नातवानेच केला आजोबांचा खून; कारण ऐकून सुन्न व्हाल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More