खेळ

भारतीय क्रिकेट संघाला 2 आठवडे ऑस्ट्रेलियामध्ये ठेवणार विलगीकरणात

ऑस्ट्रेलिया | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट मॅचेसना देखील काही काळ पूर्णविराम देण्यात आला होता. कोरोनानंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये सामना ठेवण्यात आला होता. तर डिसेंबरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामने आयोजित करण्यात आले आहेत. मात्र या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूंना दोन आठवडे विलगीकरणात ठेवलं जाणार आहे.

भारतीय क्रिकेट टीमला ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाण्यापूर्वी अ‍ॅडलेडमध्ये दोन आठवडे विलगीकरण करणं अनिवार्य असेल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले यांनी जाहीर केलंय.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी, दोन आठवडय़ांचा विलगीकरणाचा काळ निराशाजनक असल्याचं मत काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. परंतु हॉक्ले यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अन्य पर्याय नसल्याचं सांगतिलंय. 3 डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे.

हॉक्ले यांच्या सांगण्यानुसार, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ करण्यापूर्वी दोन आठवडय़ांचं विलगीकरण भारतीय खेळाडूंसाठी बंधनकारक असणार आहे. परंतु या कालावधीदरम्यान खेळाडूंसाठी पुरेश्या प्रॅक्टिसची व्यवस्था करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांच्या डाएटचीही योग्य काळजी घेतली जाईल. कोणत्याही खेळाडूच्या आरोग्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून तडजोड केली जाणार नाही.”

महत्वाच्या बातम्या-

राणे पिता पुत्रांना शिवसेनेकडून लाल तोंडाच्या माकडांची उपमा, केली सडकून टीका

राहुल बजाज यांचा बजाज फायनान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

आमचा मान राखला जात नाही; ठाकरे सरकारमधील आमदाराने केली मंत्र्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

“कारसेवकांनी नाही, तर आम्हीच बाबरी पाडली हे सांगण्याचं धाडस भाजप का दाखवत नाही?”

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या