भाजप सत्तेत आल्यापासून एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath

लखनऊ |  भाजपा सत्तेत आल्यापासून एकही दंगल झालेली नाही, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आपल्या सरकारची छबी आता बदलली आहे, असंही ते म्हणाले.

मी सूत्र हातात घेण्याच्या अगोदर राज्यात हत्या, लूट आणि दंगली सुरू होत्या. मी राज्याची प्रतिमा पूर्णपणे बदलली, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

हल्ला तर झालाच नाही किंबहूना अ‌ॅसिड हल्ला किंवा अपहरणाचं कोणतही प्रकरण समोर आलेलं नाही, असंही योगी म्हणाले.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रिपोर्टकार्ड सादर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसकडून राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ‘या’ मोठ्या नावांचा समावेश

-राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार, DMK च्या जाहीरनाम्याने देशभरात खळबळ

रणजितसिंह मोहिते पाटील माढ्यातून लोकसभेच्या रिंगणात?

-राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा, काँग्रेसला धक्का

दाऊदच्या भारतवापसीची संधी शरद पवारांमुळे हुकली- प्रकाश आंबेडकर