बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ बहूचर्चित पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पुर्ण

मुंबई | 23 नोव्हेंबर 2019 ची पहाट राजकीय वर्तुळात सर्वांच्याच कायमस्वरुपी लक्षात राहणारी ठरली. माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही चांगलीच रंगताना दिसते. या घटनेला आज दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.

हा शपथविधी राज भवनात पार पडला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथ दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान मी पुन्हा येईल, असा ठामपणे आत्मविश्वास व्यक्त केला होता. पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री होणार, अशी खात्री फडणवीसांना होती. मात्र सगळे फासे उलटे पडले.

राज्यात आपल्या दीडशेपेक्षा जास्त जागा निवडून येतील, अशी खात्री भाजपा नेत्यांना होती. लढवलेल्या 152 जागांपैकी भाजपाच्या फक्त 105 जागा निवडून आल्या. बहुमत होण्यासाठी भाजपाला 145 आमदारांची गरज होती. शिवसेनेने 124 जागी आपले उमेदवार दिले होते. त्यातील 56 जागा त्यांनी जिंकल्या. तर एनडीएतल्या मित्र पक्षांनी 12 जागा लढविल्या होत्या.

शिवसेना भाजपा युतीनंतर त्या दोघांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झाली. अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल भाजपने आम्हाला शब्द दिला असल्याचा दावा शिवसेनेनं केला. मात्र असा कोणताच शब्द दिला नसल्याचं भाजपने त्यावेळी स्पष्ट केलं. अशातच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे महाविकास आघाडीचं सरकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार याची चाहूल लागताच देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच शपथविधी आटोपून घेतला. परंतु नंतर अवघ्या 80 तासातच फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

थोडक्यात बातम्या

कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा?, केंद्रीय कृषीमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद

“जेवढा गुन्हा त्या नराधमांचा आहे, तेवढंच पाप आघाडी सरकारचं आहे”

‘त्या’ राड्यानंतर आमदार शशिकांत शिंदेंनी मागितली माफी, म्हणाले…

मुलांना नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम देताय तर सावधान! ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

येरवडा कारागृहात आमदार चक्क चावला कैद्याला, जखमी कैदी रुग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More