देश

“अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही”

नवी दिल्ली | सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी अजून 2 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. कारण 2020 च्या आधी कोरोनाची लस मिळणं कठीण आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनतील शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय.

जोपर्यंत लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही तोपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या गरजा बदलण्यासाठी कमीत संख्येत डोस उपलब्ध असतील. 2021 च्या शेवटापर्यंत जवळपास दोन कोटी डोज तयार करण्याचं उद्दीष्ट ठेवलं जाणार आहे, असं सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय.

पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात लस येईल आणि माणसं आधीसारखं जीवन जगायला सुरूवात करतील असं अनेकांना वाटत आहे. पण प्रत्यक्षात असं नसून पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत लसीचं उत्पादन करून मुल्यांकन केलं जाईल. 2021 च्या सुरूवातीला लसीचे परिणाम दिसायला सुरूवात होईल, असं सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलंय.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेनतील शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण जगभराच्या चिंतेत भर पडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मला सुशांतच्या नावाचा गैरवापर करुन मिळणारी प्रसिद्धी नकोय- निया शर्मा

‘मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व संभाजीराजेंनी करावं’; ‘या’ शिवसेना खासदाराची मागणी

दिलदार माणूस! कोरोनाच्या काळातही रतन टाटांनी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला कोट्यवधींचा बोनस

…तर एटीएममधून पैसे काढताना ओटीपीची आवश्यकता, SBI चा नवा नियम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या