बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनम गुप्तानंतर आता पुष्पाचा संदेश चर्चेत; म्हणते दिपुजी मला पळवून न्या!

मुंबई | एकेकाळी प्रेम व्यक्त करण्यासाठी चिठ्ठीचा वापर करण्यात येत होता. मात्र कालांतराने भावना जरी त्याच असल्या तरी तंत्रज्ञानामुळे चिठ्ठी कालबाह्य झाली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ‘सोनम गुप्ता बेवफा है’ अशा प्रकारचा मजकूर लिहिलेला एक नोट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

सोनम गुप्तानंतर आता पुष्पा नावाच्या मुलीने आपल्या प्रियकरासाठी थेट 20 रुपयांच्या नोटेवर संदेश लिहला आहे. या संदेशाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. कुमार आयुष या ट्विटर अकाउंटवरून त्या नोटेचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

वीस रुपयाच्या नोटेवर पुष्पाने आपला प्रियकर दिपू याच्यासाठी संदेश लिहून “माझं 26 एप्रिलला लग्न आहे, त्याआधी तू मला इथून पळून घेऊन जा, तुझीच पुष्पा आय लव यू” असं त्या 20 रुपयांच्या नोटेवर नमूद केलं आहे.

या नोटेवर लिहिलेला संदेश नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून तो खरा आहे की खोटा हे देखील अद्याप अस्पष्टच आहे. ‘सोनम गुप्ता बेवफा है’ नंतर आता पुष्पाच्या या वीस रुपयाच्या नोटेच्या संदेशाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान आज 25 एप्रिल आहे तर नोटेच्या संदेशानुसार उद्या पुष्पाचं लग्न असल्याचं तिने लिहलेल्या संदेशातुन स्पष्ट होतंय.

 

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचं कोरोनाने निधन

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो- चंद्रकांत पाटील

ती लिव्ह इन रिलेशनमधून बाहेर पडली, फोनही उचलेना, त्यानं केलं अत्यंत किळसवाणं कृत्य!

पुण्यात बनणाऱ्या कोविशिल्ड लसीची किंमत परदेशात कमी पण भारतात सर्वाधिक!

सुजय विखेंनी त्या बॅाक्समधून नक्की काय आणलं?, रुपाली चाकणकरांना मोठी शंका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More