नवी दिल्ली | कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. नियोजित विमान काल देशात विविध ठिकाणी दाखल झाली. यातून आलेल्या प्रवाशांपैकी 20 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवा बुधवारपासून 31 डिसेंबपर्यंत बंद राहणार आहे. मंगळवारी ब्रिटनमधून भारतात असंख्य प्रवासी दाखल झाले.
ब्रिटन येथून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर पाळत ठेवली जाणार आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या 20 पॉझिटिव्ह लोकांमध्ये सोमवारी रात्री दिल्लीत लँड करणाऱ्या 6, रविवारी रात्री कोलकाता येथे येणाऱ्या 2, मंगळवारी अहमदाबाद येथे येणाऱ्या 4 आणि आज अमृतसरला आलेल्या एका क्रू मेंबरचा समावेश आहे. हे सर्व लोक एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आले होते.
भारतात आतापर्यंत याप्रकारचा विषाणू आढळून आलेला नाही आणि त्याच्या स्वरुपातही कुठला महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणुच्या नव्या स्वरुपाने लशीच्या विकासावर कुठलाही परिणाम पडणार नाही, असं निती आयोगचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“मागे अहमदाबादेत येऊन ट्रम्प यांनी कोरोना पसरवला, अन् आता…”
“बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा, अन् तुम्ही त्याच बापाची चेष्टा करताय”
“आम्ही कुणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक”
“शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध”
बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या!