Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणेची दोन खून खटल्यांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मारणेच्या स्वागतासाठी शेकडो गाड्या आणि हजारो समर्थक जमले होते. तसेच त्याची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली.

मारणेच्या समर्थकांनी मुंबई-पुणे दृतगतीमार्गाच्या उर्से टोल नाक्यावर फटाके वाजवून दहशतीचं वातावरण निर्माण केल्याप्रकरणी आणि विनापरवाना ड्रोन शूटींग केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे येथे गुन्हा दाखल झाला होता. या सर्व प्रकरणाची गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांनी दखल घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर गजानन मारणेला अटक करण्यात आली.

बेकायदेशीर मिरवणुका काढणे, जमावबंदी चे आदेश असताना सार्वजनिक ठिकाणी शेकडो लोकांना एकत्रित करणं या आरोपाखाली गजानन मारणे सह जवळपास 150-200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी गजानन मारणे सह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, गजानन मारणेविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

आयसीएआयचा ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दणका, वाचा सविस्तर!

उपमुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका!

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी समर्पित केलं ‘हे’ प्रसिद्ध गाणं!

मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन मोड; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या