बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मुंबईच्या समुद्रातील 200 दशलक्ष लिटर खारं पाणी होणार पिण्यायोग्य

मुंबई | मुंबईकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई महानगरपालिका व आय.डी.ई वॉटर टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याद्वारे मालाड, मनोरी येथील तब्बल 200 दशलक्ष लिटर समुद्रातील खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड पाण्यात करण्याच्या प्रकल्पाला अखेर वेग आल्याचं दिसून येत आहे. कारण पाण्याचं नि:क्षारीकरण करण्याच्या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला.

इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्रातील पाण्याला गोड करण्याचा हा प्रकल्प असून हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे. मनोरी, मालाड येथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात खाऱ्या पाण्याचं नि:क्षारीकरण करून ते पाणी पिण्यायोग्य बनवता येणार आहे.

जागतिक पातळीवर पाण्याच्या सुरक्षिततेमध्ये इस्रायलचं तंत्रज्ञान प्रसिद्ध आहे. त्यातच इस्रायलच्या महावाणिज्य दूतांनी पाण्याच्या स्रोतांचे सक्षमीकरण करण्याची गरज व्यक्त करत सामंजस्य कराराद्वारे करत असलेल्या या उपक्रमाची अधिक माहिती दिली आहे. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते, त्यामुळे नि:क्षारीकरण ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच जगातील काही देशांनी यापूर्वीच समुद्राचं पाणी तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड करून ते वापरण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, 200 दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या या प्रकल्पाची भविष्यात 400 दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत वाढवण्याची क्षमता असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच मुंबईसाठी हा प्रकल्प सुरू करणे म्हणजे क्रांतिकारी पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या

प्रदीप शर्माची तळोजा कारागृहात रवानगी, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

“तुमची घरं वसुलीवर चालतात, पण सामान्य जनतेला नोकरी, उद्योगधंदे करून घर चालवावं लागतं”

मराठमोळ्या राहीनं पटकावलं गोल्ड मेडल; देशाला पहिलं सुवर्णपदक

पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; ‘या’ वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई 

“डबल इंजिन सरकारने बिहारमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 100 रुपये लिटर पेट्रोल केल्याबद्दल अभिनंदन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More