200 Rs Note - नवीकोरी  २०० रुपयांची नोट लवकरच चलनात येणार
- देश

नवीकोरी २०० रुपयांची नोट लवकरच चलनात येणार

नवी दिल्ली | नोटबंदीनंतर ५०० आणि २ हजार रुपयांची नोट सरकारने चलनात आणली. आता २०० रुपयांच्या नोटा लवकरच चलनात येणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी आरबीआयने २०० रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश दिले होते. जुलैपर्यंत या नोटा चलनात आणण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र हा कालावधी लांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरबीआयने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नाही, मात्र ही नोट चलनात आल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा