नवी दिल्ली | आता छोट्या शहरातील नागरिकांना परत एकदा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडीयाने (SBI) छोट्या शहरांतील एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटांचे स्लाॅट काढण्याच्या आरबीआयने सूचना दिल्या आहेत.
मोठ्या शहरांसाठी हा निर्णय भविष्यात लागू होण्याची शक्यता आहे. बँक अणि बाजारातील चलनात ही नोट उपलब्ध असणार आहे. 2 हजार रुपयांच्या स्लाॅटच्या जागी 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या स्लाॅटमध्ये वाढ होणार आहे.
उत्तर प्रदेशमधील कानपूरपासून एटीएममधून 2000 च्या नोटाचे स्लाॅट काढण्याची सुरूवात करण्यात आली, अशी माहिती बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 2000 च्या डुप्लीकेट नोटांचे वाढते प्रमाण आणि 2000 चे सुट्टे मिळायला अवघड जातात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.
2 हजारची नवी नोट चलनात आली तेव्हा लोक एटीएममधून ही नोट मिळवण्यासाठी लांब रांगांमध्ये उन्हात उभे राहून ही नोट मिळवत होते. मात्र, आता ही नोट एटीएममधून हद्दपार होणार असल्याने सर्वसामान्यांना अर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जागा ठरली; राज ठाकरे नावाची तोफ पुण्यातील ‘या’ मैदानातून धडाडणार https://t.co/6mSonJxgqf @mnsadhikrut @RajThackeray
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
न
अखेर ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा https://t.co/ljeX7cqyIp @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
अशोक चव्हाणांचे विरोधक नमले! https://t.co/MuwSPZausc @AshokChavanINC @INCMaharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
Comments are closed.