अशोक चव्हाण 2019ला लोकसभा लढणार नाही?

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ते आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

2019ला राज्यात सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

अशोक चव्हाणांच्या जागेवर लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं जात आहे. 

दरम्यान, सध्या तरी हे पक्क झालं आहे की 2019 मध्ये सत्तांतर झालेच तर अशोक चव्हाण काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप आमदाराला गावकऱ्यांनी शिव्या घालत गावातून हाकललं!

-तुमच्या वक्तव्यांमुळे आम्ही मार खातो, डायलॉगबाजी बंद करा, संजय निरुपमांना फटकारलं

-मनेका गांधींना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही- सुधीर मुनगंटीवार

-वादग्रस्त जागेवर स्वतःचं मंदिर उभारावं अशी इच्छा खुद्द रामचंद्रांची नसेन!

-मराठ्यांनी 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार रहावे- देवेंद्र फडणवीस