देश

कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | परिणामकारक पावले उचलल्याने भारतात उत्तम परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर आहे. भारतात लसीसंबधी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

राजकोट एम्सचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून केलं. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.

2020 हे आरोग्य आव्हानांचे वर्ष होतं, तर 2021 हे आरोग्यविषयक समस्यांच्या सोडवणुकीचे वर्ष असेल. भारताने ज्याप्रमाणे आरोग्य आव्हानांचा सामना करताना महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे आरोग्यसमस्यांचे निराकरण करतानाही बजावेल. जग सजगतेने आरोग्य सुविधांकडे पाहिल, असं मोदी म्हणाले.

आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी 2021 मधील भारताचं योगदान हे या समस्येच्या प्रमाणात महत्वाचं ठरेल, असंही मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”

कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर …- उद्धव ठाकरे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून 17 नंबरचा अर्ज भरता येणार!

औषध आणि काळजी हाच नववर्षाचा मंत्र- नरेंद्र मोदी

‘बिगर मुस्लीमांच्या नावाने रस्त्यांचं नामकरण व्हायला हवं’; भाजप खासदाराची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या