2024 Bajaj Chetak scooter launched :ऑटो बाजारात बजाज कंपनीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे बजाज कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन बाईक्स लाँच करत असते. अशातच बजाज ऑटोने 2024 मध्ये चेतक इलेक्ट्रिक स्कूटर जबरदस्त फीचर्ससह लाँच केली आहे. कंपनीच्या या स्कुटरमध्ये कोणकोणते आकर्षक फीचर्स आहेत हे जाणून घेऊयात…
URBANE आणि Premium या दोन प्रकारांमध्ये लाँच :
बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर URBANE आणि Premium या दोन प्रकारांमध्ये लाँच केली आहे. बजाज कंपनीने 2024 च्या चेतक EV मध्ये अनेक फीचर्ससह अपडेट्स केले आहे. तसेच स्कुटरमध्ये पॉवरट्रेनमधील बदल नवीन वैशिष्ट्ये देखील दिले आहेत. बजाज चेतक ईव्ही स्कुटर (2024 Bajaj Chetak scooter launched) ही भारतीय बाजारपेठेत Ola S1 Pro, TVS iQube, Ather 450X, Simple One यांच्याशी थेट स्पर्धा करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
2024 Bajaj Chetak scooter launched l चेतक EV स्कुटरची किंमत काय असणार :
चेतक इलेक्ट्रिक स्कूटर URBANE आणि Premium या दोन प्रकारांमध्ये लाँच केली आहे. यामधील चेतक EV URBANE या सेगमेंटची किंमत 1.15 लाख रुपये असणार आहे. तर Premium या सेगमेंटची किंमत 1.35 लाख रुपये असणार आहे. EV च्या प्रीमियम प्रकारात TecPac आवृत्ती देखील असणार आहे.
या स्कुटरमध्ये कॉल अलर्ट, डिस्प्ले थीम, म्युझिक सिस्टीम आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखे फीचर्सचा समावेश केला आहे. याशिवाय हिल होल्ड, स्पोर्ट्स मोड आणि रिव्हर्स मोड यांसारखे फीचर्स समाविष्ट केले आहेत.
2024 Bajaj Chetak scooter launched l 2024 चेतक EV: पॉवरट्रेन बद्दल जाणून घेऊयात…
बजाज या नामांकित कंपनीने लाँच केलेल्या चेतक EV मध्ये तुम्हाला 3.2 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे ही स्कुटर बॅटरी मोटर्सला 73 किमी/तास इतका वेग देण्यास सक्षम आहे.
याशिवाय कंपनीचा दावा आहे की चेतक EV स्कुटर 127 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. या इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्कुटरला 800W चार्जरने 30 मिनिटे चार्जिंगसाठी लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Ajit Pawar | अजित पवारांसमोर राडा; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानाखाली काढला जाळ
Post Office Scheme l पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पैसे गुंतवा मिळेल दुप्पट परतावा
Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!
IND vs SA | टीम इंडियाने 91 वर्षे जुना विक्रम मोडला; भारतानं रचला इतिहास
Jacqueline Fernandez अडचणीत; सुकेश चंद्रशेखरची पर्सनल चॅट लीक झाल्याने खळबळ