पुणेकरांनो सावधान, गेल्या 24 तासांतील ओमिक्रॉन रूग्णांची चिंताजनक आकडेवारी समोर
पुणे | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने देशात चांगलाच धुमाकुळ घातला होता. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिक गाफिल पाहायला मिळत आहेत.
काही दिवसांपासून ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत घट होत असताना पुण्यातून चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. पुण्यातील ओमिक्रॉनबाधितांची आकडेवारी पाहता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव खरंच ओसरला आहे का?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
राज्यात 525 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर 200 पेक्षा जास्त रूग्ण हे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आहेत. ही धक्कादायक आकडेवारी पुणे महापालिकेतून समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांत 206 ओमिक्रॉनबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रूग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आला तर कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. लोकसंख्येचा मोठा भाग ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट येत नाही तोपर्यंत कोरोनाची लाट येणार नाही, असंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“सरकार जेवायला बोलवतं आणि ताटात काहीच नसतं”
शेन वॉर्नने स्वत:ला दिला होता जुलैपर्यंतचा वेळ, शेवटच्या पोस्टची होतेय चर्चा
ऊर्जामंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; स्वा. शेतकरी संघटना आक्रमक
विकेंडनंतर 2 दिवस राज्याच्या ‘या’ भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
‘मोदीजी आम्हाला वाचवा, नाहीतर आम्ही मारले जाऊ’; विद्यार्थ्यांची आर्त हाक
Comments are closed.