मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात चोरांनी हैदोस घातला आहे. अशीच काहीशी घटना मुंबईतील जुहू परीसरात घडली आहे. एका अल्पवयीन चोराने एका घरातून तब्बल 21 लाखांचं सोनं चोरून मॅनहोल मध्ये लपवून ठेवलं होतं.
मुंबई शहरातील नेहरु नगरमध्ये पूजा नावाची महिला तिच्या परीवारासह रहात होती. काही दिवस पूजा तिच्या परिवारासह महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते. तिथून परतल्यानंतर घरातील तब्बल 21 लाखांचं सोनं चोरीला गेलं असल्याचं लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून प्राथमिक तपासाला सुरूवात केली.
घटना घडली त्यावेळी घरात कोणीही नसल्यानं पोलिसांना शेजाऱ्यांवर संशय आला. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर परिसरातील चोरट्या मुलानं आपल्या मित्रांसोबत पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी त्याने बिअरची ऑर्डर दिल्याचे समोर आलं. संबंधित मुलगा 9 वी नापास असून काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. त्याचे वडील टेम्पो चालक आहेत, घरातील परीस्थिती हालाकिची असतानाही त्याने इतक्या महागड्या किमतीच्या बिअरची ऑर्डर करण्यासाठी पैसे कुठुन आलं? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली.
दरम्यान, चौकशीमध्ये अल्पवयीन मुलानं त्याचा गुन्हा मान्य केला. परिसरातील मॅनहोलमध्ये उतरुन गटारात सोनं लपवल्याची कबुली त्याने दिली. सोबतचं सोनं चोरण्याआधी तो मोबाईल चोरी करुन तिथेच लपून ठेवायचा, अशीही कबुली संबंधित मुलानं यावेळी दिली.
थोडक्यात बातम्या-
हनिमूनच्या रात्री नवऱ्याचं वागणं पाहून नवरीही हैराण, प्रकार पाहून तुम्हीही चकीत व्हाल!
“मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे, त्यामुळे मला काही अडचण येत नाही”
न्यूज चॅनेलवर बोलताना तोल सुटला, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तुफान राडा!
सावधान ! ‘या’ सवयी असतील तर तुम्हीही लवकरच म्हातारे व्हाल, वाचा सविस्तर
बापरे… रिषभ पंतच्या फलंदाजीला घाबरुन हा खेळाडू सोडणार होता क्रिकेट!