मुंबई | राज्यसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता 14 मार्च ऐवजी 21 मार्चला घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सलग पाच वेळा पुढे ढकलण्यात आली असल्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली आणि सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.
काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं होतं. पुण्यातील शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांनी चक्का जाम आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी रस्त्यावर पडून आंदोलनात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरून मोठे वादंग निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला त्यावेळी परीक्षा ही येत्या आठ दिवसातच घेण्यात येईल आणि त्याची तारीख शुक्रवारी घोषित करू अशी घोषणा त्यांनी केली. या सर्व प्रकरणात ठाकरे सरकारवर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीका केली. अनेकांनी तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली.
विजय वडेट्टीवार यांच्या मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडून गेलेल्या शिफारसीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांच्या पत्रकात नमूद करण्यात आलं होतं. परंतु मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना या गोष्टीची काहीही माहिती नसून सचिवांनी ही शिफारस केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. भाजपच्या चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधत सचिवाला मंत्री बनवा आणि तुम्ही राजीनामा देऊन टाका, असा खोचक टोला लगावला.
अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 14 ऐवजी 21 मार्चला घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ तुर्तास मिटला आहे.
थोडक्यात बातम्या-
रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणाबाजी, पडळकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल!
मास्क आणि पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 14 जण जखमी
नवऱ्याला खुर्चीला बांधलं, दाखवला पाॅर्न व्हिडीओ आणि धारदार चाकूनं कापला…
‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’; अनिल बोंडे आणि पोलिस अधिकाऱ्यात बाचाबाची! पाहा व्हिडिओ
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू
Comments are closed.