राज्यातील 22 उमेदवारांचा ईव्हीएमवर संशय; फेर मतमोजणी होणार?

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुक पार पडली. यावेळी महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र यावेळी अनेक नेत्यांनी EVM वर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केली आहे. कारण ईव्हीएममध्ये गडबड झाली असल्याचा पराभूत आमदारांना संशय आहे.

अशातच आता महाराष्ट्रातल्या एकूण 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र निवडणुक आयोगाने मागणी मेनी केली तर उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणी करता येत असते. मात्र एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी तब्बल 47 हजार 200 रुपये शुल्क लागतं आहे. तसेच कोर्टात जर कुणी आव्हान न दिल्यास अर्ज केल्याच्या 45 दिवसांत ही पडताळणी होत असते.

Maharashtra l ‘या’ 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीची केली मागणी :

संगमनेर बाळासाहेब थोरात
पुणे कॅन्टोनमेंट रमेश बागवे
कर्जत जामखेड राम शिंदे
अहमदनगर शहर अभिषेक कळमकर
पारनेर राणी लंके
राहुरी प्राजक्त तनपुरे
कोपरगाव संदीप वरपे
विक्रमगड सुनील भुसारा
हडपसर प्रशांत जगताप
शिरूर अशोक पवार
खडकवासला सचिन दोडके
पिंपरी चिंचवड राहुल कलाटे
तुमसर चरण वाघमारे
अणुशक्तीनगर फवाद अहमद
कोपरी पाचपाखाडी केदार दिघे
ठाणे शहर राजन विचारे
ओवळा माजिवडा नरेश मणेरा
डोंबिवली दीपेश म्हात्रे
ऐरोली एम. के. मडवी
वसई हितेंद्र ठाकूर
नालासोपारा क्षितीज ठाकूर
बोईसर राजेश पाटील

News Title : 22 candidates from Maharashtra applied for EVM verification

महत्वाच्या बातम्या –

राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण

मुख्यमंत्री पदासाठी मुरलीधर मोहळांची चर्चा; ट्विट करत म्हणाले…

महागाईचा भडका! ‘या’ साबणांच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार

एकीकडे एक्स नवऱ्याची हळद तर दुसरीकडे….; समंथा प्रभूवर दु:खाचा डोंगर

धाकधूक वाढली! ‘या’ मतदारसंघाची पुन्हा मतमोजणी होणार?