बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझी आठवण काढाल तेव्हा हसून आठवण काढा’; व्हिडीओ पोस्ट करत 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

मुंबई | सोशल मीडियावर दोन व्हिडीओ पोस्ट करत कल्यामणधील 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयूर जाधव असं या तरूणाचं नाव आहे. मयूरने नदीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. मयूरने आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

एक स्वप्न होतं. पण काही गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे समोर काहीच रस्ता दिसत नाहीय. मला एवढंच बोलायचं आहे, माझी जेव्हा कधी आठवण काढाल तेव्हा हसून आठवण काढा. कारण तुमच्या जीवनात एक असा जोकर होता जो स्वत: आतमधून खूप तुटलेला असून तुम्हाला हसवण्यासाठी काहीही करायचा, असं मयूरने एका व्हिडीओत म्हटलंय.

दारु माणसाच्या जीवनातील खूप वाईट गोष्ट आहे. आज त्याच दारुमुळे. जाऊद्या नाही बोलत. ओम साई, असंही मयूर जाधवने म्हणाला. मयूर हा त्याच्या आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याच्या आत्महत्येमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयूरने आत्महत्या करुन आपल्या आई-वडिलांनाच पोरकं केलं आहे.

दरम्यान, कल्याण पश्चिमेतील कल्याण-पडघा रोडवर गांधारी पूल आहे. या पूलावरुन दुपारच्या सुमारास एका तरुणाने आपली स्कूटी गाडी पूलाच्या बाजूला लावली. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली, अशी माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच खडकपाडा पोलीस गांधारी पूलावर दाखल झाले. या प्रकरणाचा तपास पडघा पोलीस करणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘कामे वेळेत आणि दर्जेदारपणे पू्र्ण करा, अन्यथा…’; अशोक चव्हाणांनी कंत्राटदारांना भरला दम

“उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही, लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या”

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार?; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

“सरकारचं लसीकरण धोरण योग्यच, ते तज्ज्ञांनी विचार विनिमय करुन तयार केलंय”

‘कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय’; यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More